रत्नागिरीतल्या त्या शिक्षणविस्तार अधिकार्यावर कारवाई होणार.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षणविस्तार, अधिकार्यांबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. याची गंभीर दखल आम्ही घेतली आहे. कारवाईला विलंब का झाला, या खोलात जाण्यापेक्षा येत्या शुक्रवारी संबंधित शिक्षण विस्तार अधिकार्यांवर कारवाई केली जाईल. त्यांना पाठिशी घालणार्या शिक्षण अधिकार्यांचीही चौकशी होईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पत्राद्वारे परिषदेत त्या बोलत होत्या.
रत्नागिरी पंचायत समितीमध्ये हा विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे शहराचासुद्धा पदभार आहे. तीन महिन्यापूर्वी या विस्तार अधिकार्यांच्या गैरवर्तनाला एका मुख्याध्यापिकेला सामोरे जावे लागले होते. याबाबत त्या मुख्याध्यापिकेने जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली हाती. यानंतर पुन्हा एका शिक्षिकेने तो शिक्षणविस्तार अधिकारी त्रास देत असल्याची तक्रार केली होती.www.konkantoday.com