मुंबई-गोवा महामार्गाच्या खवटी-परशुराम चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जावर आक्षेप.
मुंबई-गोवा महामार्गाच्या खवटी ते परशुराम घाट या ४४ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणात तब्बल १०० हून अधिक ठिकाणी कॉंक्रीटीकरण रस्त्याला तडे गेले आहेत. याबाबत भरणे येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंत्यांना निवेदन चौपदरीकरणातील चुकीच्या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. खेड तालुक्यात खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले तरी महामार्गाला ठिकठिकाणी तडे जात आहेत.
चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणार्या विभागातर्फे चौकशी न करताच मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. खवटीपासून परशुरामदरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज कंपनीने केले असून अनेक ठिकाणी निकृष्ट काम झाल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.www.konkantoday.com