नौदलाच्या माजी सैनिकांचा मेळावा ३० डिसेंबर रोजी चिपळूणमध्ये.

रत्नागिरी, दि. २० : नौदलाच्या माजी सैनिकांचा भव्य मेळावा सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. पर्यंत करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता यांनी सदर मेळाव्यात अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे जिल्ह्यामधील फक्त नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पितांसाठी आय. एन. एस. हमला, मोर्वे, मालाड, मुंबई यांच्या तर्फे सोमवार दि.३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेन्शन विषयक, मेडिकल व स्पर्श (SPARSH) विषयक व इतर अभिलेख विषयक अडचणी असल्यास या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या अडी-अडचणींचे निरसन करु शकता.

त्याकरीता आपल्या सोबत पीपीओ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सोबत आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच डिर्स्चाज बुक, PART II ORDER च्या कॉपी (असल्यास), पॅन कार्ड, ईसीएचएस कार्ड, कॅन्टीन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र, इत्यादी घेऊन सदर मेळाव्यात उपस्थित रहावे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button