
नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्यावतीने श्री. नितीन आणि सौ. दीप्ती कानविंदे यांच्या दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्यावतीने नुकताच आर्ट सर्कलचे श्री. नितीन आणि सौ. दीप्ती कानविंदे यांच्या दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला. या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे सदस्य उपस्थित होते.श्री. मंगेश बापट यांनी सौ. दीप्ती आणि नितीन कानविंदे यांचा परिचय करून दिला तर अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कला आणि संस्कृती संवर्ंधनाचे काम राजे महाराजे करत होते. नंतरच्या काळात देवस्थानानी ही भूमिका बजावली. आता संस्था कलाकार आणि संस्कृती संवर्धनाचे काम करीत आहेत. संस्थेचे कार्यकर्ते संस्था मोठी करण्याचे काम करीत असतात. काणत्याही व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते.
कार्यकर्त्यांनी स्वतःचे पद अभिनवेश न बाळगता संस्थेसाठी समर्पित भावनेतून काम करावे, असे मत नितीन कानविंदे यांनी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेत कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले.www.konkantoday.com