चिपळूण रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा ६० हजारांचा ऐवज लांबविला.
चिपळूण रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. ०२ वर तुतारी एक्सप्रेसमध्ये चढणार्या प्रवाशांच्या पाकीट आणि ५५ हजारांचा मोबाईल व पाच हजार रुपये रोख अशी ६० हजाराची चोरी झाली आहे. ही घटना दि. १६ डिसेंबर रोजी रात्री १२.१५ वा. घडली. फिर्यादी ऐश्वर्य जगदीश सावंत (२२, रा. होनर्स कॉलनी, वाशी फायर ब्रिगेड सेक्टर, १६ वाशी नवी मुंबई) हे चिपळूण ते मुंबई असे जाणेकरिता तुतारी एक्सप्रेसने चिपळूण रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. ०२ वर आले असता, तुतारी एक्सप्रेसमध्ये चढणार्या प्रवाशांची गर्दी असल्याने दरवाजात्यातून डब्यात चढण्याकरिता गर्दी झाल्याने ते सिट पकडण्याच्या धक्काबुक्कीमध्ये फिर्यादी यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेले ब्राऊन रंगाच पाकिट व डाव्या खिशात ठेवलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला. म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com