आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित – गझल आख्यान.
काव्य प्रकारातील काळजाच्या जवळचा विषय म्हणजे गझल…पण गझल हे तंत्र आहे. तो जितका हळवा काव्यप्रकार आहे तितकाच तो व्याकरण शास्त्रातील एक अभ्यासाचा भाग आहे. गझल गायन हीदेखील एक अभ्यासाची मखमली शाखा आहे. याच अभ्यासाची गंमत आहे डॉ. आशिष मुजुमदार यांच्या गझल आख्यान या सुरेख शब्द मैफिलीत. गझल म्हणजे काय, गझल आणि कविता यातला फरक, गझलियत, शेर, संगीतबद्ध करताना केलेला विचार या सगळ्या गोष्टी या आख्यानात मुजुमदार उलगडून दाखवला आहेत.
अनेक कविता, गाणी आणि गझला आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. त्यातील सोबतीचा करार ही तर विशेष उल्लेखनीय यशस्वी मैफल. *रविवार 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ही शब्द मैफल शर्वाणी हॉल येथे आयोजित केली आहे.*गझलकार, कवी, गायक, आणि गझलप्रेमी सर्वांनी एकत्र आनंद घ्यावा अशी ही मैफल आहे. धकाधकीच्या दैनंदिन जीवनात उत्तम आणि समृद्ध आयुष्य जगायला शिकवणारी गझल अनुभवायला नक्की या!