संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये 6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद


रत्नागिरी, दि. 4 ) : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी, संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी 6 फेब्रुवारी (मतदानाच्या आदला दिवस), 7 फेब्रुवारी (मतदानाचा दिवस) आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रातील तसेच ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणच्या कार्यक्षेत्रातील सर्व ठोक तसेच किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 6 व 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत सदर विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद व रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, लांजा, राजापूर या 9 पंचायत समित्यांच्या निवडणूकीकरीता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, मनुज जिंदल यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ (१) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त आदेशान्वये, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९१५ जिल्ह्यात च्या कलम १३५ (सी) मधील तरतुदीनुसार रत्नागिरी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निर्वाचन क्षेत्रातील तसेच ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणच्या कार्यक्षेत्रातील सर्व ठोक तसेच किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-१, एफएल-२, एफएल-३. एफएल- ४ ( क्लब अनुज्ञप्ती), एफएल / बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल / एफएल/टिओडी-३, टिडी-१ इ.) ६ फेब्रुवारी २०२६ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), ७ फेब्रुवारी २०२६ रोजी (मतदानाचा दिवस) या दिवशी संपूर्ण दिवस व ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित जिल्हा परिषद/पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रातील सर्व ठोक तसेच किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button