सावर्ड्यात सावकारीतून एका व्यापार्याला जीवे मारण्याची धमकी.
व्याजाची रक्कम १ लाख ४५ हजार रुपये दर महिना भरण्यास नकार दिल्याने यातूनच एका सावकाराने कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी सोमवारी सावर्डे पोलीस ठाण्यात सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैभव रामचंद्र सावंत असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद स्वानंद शांताराम बांबाडे (३८) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वानंद बांबाडे यांचे सावर्डे बाजारपेठ येथे कपड्याचे दुकान आहे.www.konkantoday.com