शोभेच्या माशाच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केले शोभिवंत माशांचे ऍप.
शोभेच्या माशांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शौकीन, शेतकरी आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने शोभेच्या माशांचे ऍप्लिकेशन विकसित केले आहे. जागतिक शोभेच्या माशांच्या व्यापारात भारत खूप मागे पडला आहे. आणि या उपक्रमामुळे देशाला जागतिक बाजारपेठेत सन्माननीय स्थान मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रंगीत मछली नावाचे ऍप शोभेच्या माशांची काळजी, प्रजनन आणि देखभाल याविषयी बहुभाषिक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक माहिती देवू शकेल.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली की ऍप आठ भारतीय भाषांमध्ये सामग्री उपलब्ध करेल, रंगीन मछली ऍप शोभेच्या माशांच्या व्यापार्याला प्रोत्साहन देईल.www.konkantoday.com