रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्या बंदरामध्ये सापडलेल्या अजगरावर यशस्वी उपचार.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्याबंदर समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडलेल्या अजगराला १९ ऑक्टोबर रोजी पुणे रेस्क्यू टीमकडे उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याच्यावर तीन महिने उपचार करून येथील वनविभागाकडे पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहे.मिर्या बंदर समुद्रकिनारी अजगर जातीचा साप जाळीमध्ये अडकला असल्याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर तत्काळ जागेवर जावून शहीद तांबोळी व वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे यांनी जाळीतून सुटका केली व त्याला ताब्यात घेतले.www.konkantoday.com