दोडामार्ग- वीजघर राजमार्गावरील वाहतूक पोलिसांनी नव्हे तर नागोबाने पंधरा मिनिटे रोखून धरली.
दोडामार्ग- वीजघर राज्यमार्ग चक्क एका नागराजने रोखून धरल्याचा प्रकार बुधवारी आंबेली येथे घडला. रस्त्याच्या मध्यभागी फणा काढून उभा नागराज पाहून वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.हा नागोबा भर रस्त्यातच ठाण मांडून असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे पंधरा मिनिटांच्या अवधीनंतर हे नागराज लगतच्या शेतात निघून गेल्यानंतर वाहतूक मार्गस्थ झाली.दोडामार्ग -वीजघर राज्यामार्गवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या राज्य मार्गावरील आंबेली येथे मंगळवारी सायंकाळी एक नाग मार्गावर आला. त्याला पाहून दोन्ही बाजूची वाहने थांबली. वाहने व माणसांना पाहून बावरलेल्या नागराजाने आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार स्वरक्षणासाठी फणा काढल्या व भर रस्त्यातच ठाण मांडले. फणा काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहत अंदाज घेऊ लागला. हा फणाधारी नाग पाहून वाहनधारकांची तारांबळ उडाली. दोन्ही बाजुच्या वाहन चालकांनी त्यांच्या पासून सुरक्षीत अंतरावर उभे रहात, त्याची हालचाल पाहू लागले. काहीनी या नागोबाचे मोबाईलद्वारे फोटो काढलेे व व्हीडीओ शुटींग केले. मात्र नागाला पुढे जाणे सुरक्षीत वाटत नसल्यानेसुमारे पंधरा मिनीटे तो रस्त्यातच फणा काढून बसला होता. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर परिस्थितीचा अंदाज घेत पंधरा मिनिटानंतर नाग तेथून निघून गेला. यानंतर सर्वांनी आपली वाहने मार्गस्थ केली.