जप्त डिझेलसह बोटीवर शस्त्रधारी पोलिसांची नजर.
दापोली तालुक्यातील हर्णै येथून तस्करी करताना जप्त केलेले डिझेल व बोट यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आर्मगार्ड म्हणजेच शस्त्रधारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. सदर बोट दाभोळ जेटी येथे उभी करण्यात आली आहे. हर्णै बंदरातून तस्करी करण्याकरिता आलेल्या या बोटीवर दापोली पोलिसांनी धडक कारवाई करत रविवारी छापा मारला. या बोटीमधील सुमारे १४ खणांमधील ३० हजार लिटर डिझेल सदृश द्रावण ताब्यात घेतले.www.konkantoday.com