एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या नीलकमल बोटीच्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरली नौदलाच्या स्पीड बोटीची धडक, पहा व्हिडिओ.
मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीनेच धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचं आता समोर आलं आहे.एवढंच नव्हे तर ज्या क्षणी नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली तो क्षण देखील कॅमेऱ्यात आता कैद झाला आहे. ही दृश्य पाहून आपल्याला अपघाताची नेमकी तीव्रता लक्षात येईल.खोल समुद्रात बोट उलटल्याने त्यात जीवितहानी झाल्याची भीतीही आता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु केलं. मिळालेल्या माहितीनुसार, नीलकमल बोटीत एकूण 80 प्रवाशी होते. जे या बोटीतून प्रवास करत होते. यापैकी साधारण 66 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं. अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या दुर्घटनेबाबत अपघातग्रस्त नीलकमल लाँचचे मालक राजेंद्र परते यांनी नेमकी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘आमची बोट रोज अडीच वाजेच्या सुमारास एलिफंटाला जाते. बोट सव्वा तीन वाजता निघाली. काही अंतर कापून पुढे गेल्यानंतर आमची बोट जिथे होती तिथे एक नौदलाची स्पीड बोट आली. त्या स्पीड बोटीने आधी एक राऊंड मारला आणि ती दूर निघून गेली. पण पुन्हा एकदा ती आमच्या दिशेने आली.. तेव्हाच त्या स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक मारली. त्यामुळेच हा अपघात झाला.’अपघात झाला तेव्हा आमच्या बोटीत 80 लोकं होतं. किती जणांना वाचवलं हे काही आम्हाला समजू शकलेलं नाही. पण आमच्या बोटीची प्रवाशी क्षमता ही 130 एवढी आहे.’हा व्हीडिओ बोटीवरील प्रवाशानेच काढला आहे.
ही धडक एवढी जोरदार होती की, ज्यामध्ये नीलकमल बोटीचे दोन तुकडेच झाले आहेत.’ अशी माहिती नीलकमल बोटीचे मालक परते यांनी दिली आहे. मात्र नौदलाच्या मते या बोटीत 80 पेक्षा जास्त लोक होती