संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी केतकवणेवाडी येथे जलजीवनचे काम निकृष्ट
संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी केतकवणेवाडी येथील जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. येथील ग्रामस्थांनी येत्या २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.या कामाची नुकतीच माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, संगमेश्वर ताकाध्यक्ष शेखर जोगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी करण्यात आली. निकृष्ट दर्जाचे साहित्य, नियमांना फाटे फोडून चुकीच्या पद्धतीने झालेली कामे, अपूर्ण असलेली कामे यामुळे पंतप्रधान मोदींच्या हर घर पाणी या योजनेला घर घर लागल्याचे चित्र आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण दाखवून निधीची मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com