विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजप कडून राम शिंदे यांच्या नावाची घोषणा
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होणार याची सगळे प्रतिक्षा करत आहे. तर दुसरीकडे भाजपने आता शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपने राम शिंदे यांच्या नावाची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे.राम शिंदे हे बुधवारी आपला अर्ज दाखल करणार आहे. भाजपच्या या घोषणेमुळे शिवसेना धक्का मानला जात आहे.महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे.
याच अधिवेशनामध्ये विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मागील दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे सभापती कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. भाजपकडून राम शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. अखेरीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.भारतीय जनता पार्टीचे नेते आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.