
वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ९ खून, ११ जणांवर खुनी हल्ल्याच्या प्रकारांची नोंद.
रत्नागिरी जिल्ह्याचा गुन्हेगारी आलेख इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे; परंतु अधुनमधून घडणाऱ्या खून आणि खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हावासियांना हादरा बसत आहे.जमिनीचे वाद, घरगुती कारणांमुळेच खुनाचे प्रकार घडत आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ९ खून, ११ जणांवर खुनी हल्ल्याच्या प्रकारांची नोंद झाली आहे. यापैकी बरेचसे प्रकार उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.शांत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत खुनाच्या घटनांचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणांचे काम वाढले आहे. कोकण रेल्वे, जलमार्ग, रस्त्यांचे विस्तारीकरण आदींमुळे गुन्हेगार रत्नागिरी जिल्ह्यात आश्रयाला येत आहेत, हे तपासातून उघड झाले आहे.