रत्नागिरी होणार धावनगरी५ जानेवारीला हाफ मॅरेथॉनकोकण कोस्टल मॅरेथॉन पर्व दुसरे.

रत्नागिरी : कोकणवासीयांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असं जिला संबोधलं गेलंय त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन दर वर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी करण्यात आले आहे.५ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी धावनगरी होणार असून नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अंतर असलेली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सालाबादप्रमाणे सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली आहे.

मागील वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. या स्पर्धेत विजेत्यांना ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.रन फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना घेऊन दुसऱ्या वर्षीची ही स्पर्धा होणार आहे. ५ किमीसाठी ७० मिनिट, १० किमी १२० मिनिटात आणि २१ किमी अंतर २१० मिनिटांत पूर्ण करायचे आहे. स्पर्धेची सुरवात थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून होईल. २१ किलोमीटरसाठी नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोपमार्गे भाट्ये समुद्रकिनारा असा मार्ग आहे. १० किमीसाठी नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिर मार्गे भाट्ये आणि ५ किमीसाठी मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत स्पर्धक येतील.

रत्नागिरी जिल्हा एथलेटिक्स असोसिएशन च्या मान्यतेने होत असणारी ही मॅरेथॉन आहे.स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन असून रूट पार्टनर रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आहे. स्वच्छता पार्टनर रत्नागिरी नगरपरिषद आहे. तसेच अनबॉक्स हे या उपक्रमाचे H2O पार्टनर आहेत.सन्मानीय कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून देखील या उपक्रमाला भरीव प्रोत्साहन मिळाले आहे . बॅंक ऑफ इंडिया, पितांबरी प्रॉडक्टस, आर्यक सोल्यूशन्स हे सुद्धा या मॅरेथॉन चे प्रायोजक आहेत.नोंदणीसाठी शेवटचे ७ दिवस शिल्लक असून *रजिस्ट्रेशन लिंक :* https://events.fitasf.com/konkan-coastal-2025.html या वर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. *रत्नागिरीकरांसाठी ऑफलाइन नोंदणी* तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन रजिस्टर करता येत नाहीये त्यांच्यासाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन रत्नागिरी शहरात खालील ठिकाणी उपलब्ध आहे.जोशी फूड्स (हॉटेल मिथिला शेजारी), हॉटेल फ्लेवर्स (के सी जैन नगर), उत्कर्ष स्टेशनरी (हॉटेल कार्निवल शेजारी), हॉटेल कार्निवल इन, आनंदकल्प हॉस्पिटल (शांती नगर). या ठिकाणी जाऊन ऑफलाईन फॉर्म भरावा आणि फॉर्म वरती असलेला QR स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करावे. *प्रॅक्टिस रनला उदंड प्रतिसाद* स्पर्धेपूर्वी अनेक दिवस थिबा पॅलेस रोड येथे दर रविवारी वॉर्म अप, प्रॅक्टिस रन आयोजित केली जात होती . रत्नागिरीकर धावू लागले आहेत, फिटनेस करिता त्यांनी लक्ष दिल्याचे दिसून येऊ लागले असून धावनगरी रत्नागिरी होण्याची ही आता एक चळवळ झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button