रत्नागिरी तालुक्यातील गोळप कातळवाडी येथे कर्ज देण्याचे आमिष दाखवून २ लाख ३० हजारांची फसवणूक.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप कातळवाडी येथे लोन कंपनीकडून मिळवून देण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनीच्या विभाग प्रमुखाने महिलेची २ लाख ३० हजार ४९९ रुपयाची फसवणूक केली. ओमकार पालव (रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्यादी महिलेने पूर्णगड पोलीस ठाण्यात दि. १६ डिसेंबर रोजी तक्रार दिली.
त्यानुसार फिर्यादी महिला, साक्षीदार हे दोघे गोळप कातळवाडी येथे राहतात. त्यानी दि. २४ ऑक्टोबर रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून स्मॉल फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीचे लोन विभागाचे प्रमुख ओमकार पालवशी संपर्क करून कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर संशयित ओमकार पालवने फिर्यादी महिलेला १० ते १२ महिलांचा गट तयार करा, तुम्हाला कर्ज पुरवण्याची व्यवस्था करतो. असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्जाच्या प्रक्रियेसाठी सभासद नोंदणी, भाग-भांडवल फी, नोटरी, स्टॅम्प, वकील कोर्ट फी स्टॅम्प यासाठी संशयित ओमकार पालवने फिर्यादी महिलेकडून रोख गुगल पेद्वारे एकूण २ लाख ३० हजार ४९९ रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून कर्ज न देता फसवणूक केली.www.konkantoday.com