मी अजित पवारांना खोगोची गोळी देणार- भास्कर जाधव
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सतत शाब्दिक हल्ले केले.तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होते. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील अजित पवार अनुपस्थितीत राहिले. घशाला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
मात्र छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अजित पवारांनी माध्यमांपासून दूस राहणं पसंत केल्याची देखील राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.अजित पवार आज हिवाळी अधिवेशनात देखील सहभागी होणार आहे. यावरुनच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित दादा यांचा घसा खराब असल्याने मी त्यांना खोगोची गोळी देणार आहे, ती अजित पवारांनी घशात ठेवावी, असा मिश्किल टोला भास्कर जाधव यांनी लगावला.