मजगाव येथील दोन तरुणाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर केले यशस्वी.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी माजगाव येथील दोन तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या तरुणांच्या आवाहनाला रत्नागिरीतील नागरिकांनी प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिर यशस्वी करून दाखवले. मजगांव येथील फैज मुकादम आणि शैजान मापारी या दोन तरुणांनी पुढाकार घेऊन ऐसास वेल्फर अँड चॅरीटेबल ट्रस्ट मजगांव यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येथील शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सामजिक कार्याची आवड असलेल्या या दोघा तरुणांनी रक्तदान करण्यासाठी नागरिकांना आव्हान केले. रक्त दात्यानी या आवाहनाला प्रतिसाद दाखवला.
या रक्तदान शिबिरात चांगल्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले. यामुळे जिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात नियंत्रणात आला. या शिबिरासाठी या तरुणांना जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी तसेच लांजा येथील मुनाफ दसुरकर, महंमद दसुरकर मुदस्सर मुकादम,अरसालान डिंगणकर, बशीर शेख, इकरा सारंग, राहिला जिवरक, अर्श आवटे, अय्यान झारी,, पुष्कर शिवलकर, शशिकांत मांडवकर, युसूफ संगमेश्वरी,मजगांव गावचे सरपंच फय्याज मुकादम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.