दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-कुडाळ मार्गावर आकेरी घाटीच्या पायथ्याशी दोन दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा डोक्याला मार बसून जागीच मृत्यू झाला. सागर लक्ष्मण साईल (वय ३५, रा.कोलगाव-वाघडोळवाडी) असे त्याचे नाव आहे. काल सायंकाळी सातच्या सुमारास कोलगाव येथून झाराप येथे जाताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरील दुचाकीला धडक बसून हा अपघात घडला.