जयगड वायु गळती प्रकरणी पालक संतापले,कंपनीच्या विरोधात रस्ता रोको.
काही दिवसापूर्वी जयगड येथील जिंदाल पोर्ट कंपनीच्या टॅंक मधून वायुगळती झाली होती त्याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला होता पोट दुखी मळमळ व श्वास घ्यायला त्रास झाल्याने अनेकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यातील काही जणांना सोडून दिल्यानंतर अजूनही काही जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आले होतेमात्र आज शाळेतील पालकांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरत कंपनीविरोधात रास्ता रोको केला. जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांनी आज संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीनंतर पालकांनी थेट जयगड सागरी पोलीस ठाणे गाठले. तेथे कंपनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली.गेल्या गुरुवारी जिंदाल कंपनीच्या गॅस प्लांटमधून वायु गळती होऊन त्याचा त्रास शेजारीच असलेल्या जयगड माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झाला होता. यात ६९ विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले होते. त्यानंतर दोन ते तीन दिवस उपचार घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र आता आठवडा होत आला तरीही विद्यार्थ्यांसह काही प्रौढ व्यक्तींना या वायू गळतीचा त्रास होत आहे.आजच्या घडीला २ प्रौढांसह एकूण ३४जण रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. आक्रमक झालेल्या पालकांनी चाल करतर कंपनीचा प्रवेशद्वार बंद करत कंपनीच्या गाड्या देखील रोखल्या असून, या घटनेला कोणतेही हिंसक वळण लागू नये यासाठी जयगड येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.