खेड तालुक्यातील वेरळ-खोपी मार्गावर वेरळनजिक अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू.
खेड तालुक्यातील वेरळ-खोपी मार्गावर एर्टिगा कारने दिलेल्या धडकेत सागर घनश्याम खेडेकर (४१) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर पलायन केलेल्या कारचालकावर सोमवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.राजू भागोजी केदारी (३८) असे फरार चालकाचे नाव आहे. सागर खेडेकर हे ऍक्टिव्हा दुचाकीने वेरळ ते खोपी असा प्रवास करत होते. याचदरम्यान राजू केदारी याच्या ताब्यातील कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात त्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने मृत्यू झाला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल पंजार्या कोकणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.www.konkantoday.com