
मांडवी मुखाकडील गाळ काढणे कामास डिझेलसाठी ५० लाख-पालकमंत्री उदय सामंत
*रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): मांडवी मुखाकडील गाळ काढण्याचे काम नाम फाऊंडेशन कडून करुन घ्यावे. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलची तरतूद म्हणून ५० लाख रुपये देण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री श्री.सामंत यांनी विविध विषयांवर बैठक घेतल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, मुख्याधिकारी तुषार बाबर, बिपीन बंदरकर, अभिजीत गोडबोले, राजन शेट्ये, विजय खेडेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मेरीटाईम बोर्डाने भेट देऊन गाळ काढण्यासंदर्भात पाहणी करावी. त्याबाबत अंदाजपत्रक तयार करुन घ्यावे. तारकर्लीवरुन सक्शन रेजर मागवावा.
३ तारखेला जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल मूर्ती लोकार्पण सोहळ्याचे नियोजन नगरपालिकेने करावे. त्याचबरोबर ४ तारखेला राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्याचे नियोजन करावे. त्यासाठी शोभायात्रा आयोजित करावी.
विश्वनगर वसाहतीचे भुईभाडे कमी करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी बैठकीत निर्देश दिले.
www.konkantoday.com