कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेवर टांगती तलवार
जिल्हा परिषद, प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र राज्यातील अन्य दोन जिल्ह्यांनी कंत्राटी भरतीला स्थगिती दिल्यामुळे रत्नागिरीतील प्रक्रियेलाही टांगती तलवार आहे. पहिल्या टप्प्यात १०६ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर दुसर्या टप्प्यात चारशे ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन सुरू आहे.
आंतरजिल्हा बदल्या, सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि विलंबाने झालली शिक्षक भरती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढतच होती. निवडणुकीपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेला एक हजार नवीन शिक्षक मिळाले होते. मात्र ही भरती झाल्यानंतर काही शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यात आले. परिणामी, जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या पुन्हा ९०० पेक्षा अधिक झाली आहे. www.konkantoday.com