
हिवाळी पर्यटनासाठी कोकणात येणार्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर थांबे वाढले.
हिवाळी पर्यटन हंगामासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणार्या विशेष गाड्यांना अखेर कोकण रेल्वेने थांबे वाढवले आहेत. या विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेने बुधवारी केली आणि कोकणात या गाड्यांना देण्यात आलेल्या अपुर्या थांब्यांची बाब कोकण रेल्वे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने रेल्वेला तात्काळ पत्र पाठवून निदर्शनास आणून दिली. त्यानुसार कोकण रेल्वेने मुंबई ते करमाळी दरम्यान धावणार्या विशेष गाडीला आणखीन तीन थांबे दिले आहेत.
या संदर्भात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत ०११५१/०११५२ मुंबई करमाळी हिवाळी विशेष गाड्यांना वीर, वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे दिल्याबद्दल अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वेचे आभार मानले आहेत. दररोज धावणार्या विशेष गाडीला अपुरे थांबे असल्याचे लक्षात आल्यावर समितीने विनंती केल्यानुसार आरक्षण सुरू होण्याआधीच हे वाढीव थांबे दिल्यामुळे संबंधित तालुक्यात प्रवाशांना गर्दीच्या हंगामात दिलासा मिळणार असल्याचे समितीने म्हटले आहे.www.konkantoday.com