
नागपूर ते गोवा रेल्वे सुरू होण्याची शक्यता
रत्नागिरी ः नागपूर ते गोवा ही नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा यांनी नागपूर येथे बोलताना दिली. नागपूरहून गोव्याकडे जाणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे परंतु सध्या गोव्याला जाण्यासाठी थेट गाडी नाही त्यामुळे आधी पुणे किंवा मुंबई येथे जावून तेथून गोव्याला जावे लागते. गोव्यासाठी थेट गाडी सुरू करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. नागपूर ते गोवा गाडी प्रायोगिक तत्वावर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली होती त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. परंतु ती काही कालावधीनंतर बंद करण्यात आली होती. पुरेशी पर्यटकांची संख्या उपलब्ध झाल्यास ही गाडी परत सुरू करण्यात येईल असे आश्वासन महाव्यवस्थापक शर्मा यांनी दिले.