‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी १४०० कोटी रुपये; ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : विधानसभा निवडणुकांआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर आला असून आता या योजनांचा खर्च भागविण्यासाठी आणि मेट्रो, रस्ते, पूल, सिंचनासह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्प यांची कामे सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात सुमारे ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुतीला निवडणुकीत मोठा राजकीय लाभ मिळून सत्ता मिळाली. त्यामुळे या योजनेसाठी १,४०० कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा निवडणुकीआधी करण्यात आली होती. या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये २,७५० कोटी रुपये इतका निधी देण्यात आला असून पंतप्रधान कुसूम कृषीपंप योजनेसाठी ३५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्योगांच्या विविध सवलतींसाठी एक हजार कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

राज्य सरकारने केवळ एक रुपयांत शेतकऱ्यांना पीकविमा योजना लागू केली आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य सरकार व शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी ८१४ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.राज्य सरकारने मेट्रोसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. मुंबईतील मेट्रो तीन प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या समभागापोटी ६५५ कोटी ३० लाख रुपये, दुय्यम कर्जापोटी ५५७ कोटी २२ लाख रुपये, मुद्रांक शुल्कावर जमा झालेल्या मेट्रो अधिभारातून मेट्रो प्रकल्पांची कर्जे व व्याजासाठी ७७८ कोटी ५४ लाख रुपये तर पुणे मेट्रोसाठी ६०१ कोटी ५९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात आशियाई विकास बँकेच्या कर्जातून रस्ते व पुलांची अनेक कामे करण्यात येत असून त्यात राज्य हिश्श्यापोटी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे, तर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारवर बरीच टीका झाली होती.

आता राज्य सरकार हा पुतळा उभारत असून त्याच्या कामासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ३१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतूद

वाढवण बंदर प्रकल्पातील राज्य हिश्श्यासाठी १०३ कोटी रुपये* पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य व शेतकरी हिश्श्यापोटी ८१४ कोटी ६४ लाख रुपये*

मुद्रांक शुल्कावर जमा झालेल्या मेट्रो अधिभारातून मेट्रो प्रकल्पांच्या कर्ज व व्याजासाठी ७७८ कोटी ५४ लाख रुपये* मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या समभागापोटी ६५५ कोटी ३० लाख रुपये अतिरिक्त निधी – मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी दुय्यम कर्जापोटी ५५७ कोटी २२ लाख रुपये* पुणे मेट्रोसाठी ६०१ कोटी ५९ लाख रुपये

* आशियाई विकास बँकेच्या कर्जातून होत असलेल्या रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी १५०० कोटी रुपये

अतिरिक्त निधी*

समृद्धी महामार्गासाठी ५०० कोटी रुपये* शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी २७५० कोटी रुपये*

पंतप्रधान कुसूम योजनेसाठी ३५४ कोटी रुपये अतिरिक्त तरतूद – उद्योगांना देय विविध सवलतींसाठी एक हजार कोटी रुपये* मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी ३१ कोटी ७५ लाख रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button