माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी फणसवळे गावातील सभा मंडप साठी केली 5 लाखाची मदत.
फणसवळे गावात नवरात्र उत्सव च्या ठिकाणी दरवर्षी तात्पुरता सभा मंडप उभारण्यात येतो, त्या ठिकाणी कायम स्वरूपी सभा मंडप बांधून मिळावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे व तालुका सरचिटणीस उमेश देसाई यांचेकडे ग्रामस्थ वाडीप्रमुख संतोष आंबेकर व मुकेश माने व इतर सर्व ग्रामस्थांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तालुका अध्यक्ष उत्तर श्री विवेक सुर्वे व तालुका सरचिटणीस उमेश देसाई यांनी आपण चव्हाण साहेबांकडून आपणास 5 लाख रुपये ची सभा मंडप साठी मदत देतो असे सांगून काही दिवसापूर्वी ही रक्कम ग्रामस्थांना देण्यात देखील आली. या सभा मंडप चा आज भूमिपूजन कार्यक्रम श्रीफळ वाढवून भाजप तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी व भाजप तालुका अध्यक्ष उत्तर विवेक सुर्वे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बावा शेठ नाचणकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतिक देसाई, गावकर संतोष आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पक्षाचा आदेश वजा कोकण विभागाची पक्षाने दिलेली जबाबदारी दिल्यावर पक्ष कार्यासाठी तन मन धन अर्पून एक ध्येय वेडा नेता , दिलेली जबाबदारी यशस्वी पणे सांभाळणारा , नेतृत्वासोबत महान दातृत्व असणारा नेता म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब आहेत.. असे बोलून चव्हाण साहेबांचे सर्वांनीच आभार मानले व त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.