मचूळ व खारट पाण्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या समस्येत भर, जलवाहिनीत चक्क कुजलेला साप.
चिपळूण शहर व परिसरात मचूळ व खारट पाण्याचा विषय गंभीर बनलेला असतानाच एक धक्कादायक प्रकार रविवारी मार्कंडी जांभळेवाडी परिसरात समोर आला आहे. नगर पालिकेच्या पाणी पुरवठा करणार्या जलवाहिनीत चक्क कुजलेल्या अवस्थेतील साप अडकल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरातून या प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. www.konkantoday.com