मंत्री उदय सामंत यांना आता सार्वजनिक आरोग्य विभाग देण्यात येणार?
महाराष्ट्र सरकारच्या नूतन मंत्र्यांचा रविवारी (दि. १५) शपथविधी पार पडला. त्यानंतर कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यासंदर्भात नियोजन सुरू करण्यात आले आहेदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. शहरी विकास विभाग, गृहनिर्माण, आणि उद्योग विभागासह महत्त्वाची खाती ते स्वत:कडे कायम ठेवणार असल्याचे समजते. दरम्यान, यापूर्वी उद्योग विभाग सांभाळणाऱ्या मंत्री उदय सामंत यांना आता सार्वजनिक आरोग्य विभाग देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.