मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील पशुधन चोरी प्रकरणी एकाला अटक.
मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील पशुधनाची चोरी झाल्या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी चोवीस तासांच्या आत संशयित आरोपी जाफर अन्वर शेख (३४, रा. नेहरूनगर, बांगणी, एकविरा नगर) याला ताब्यात घेतले आहे.या चोरी प्रकरणी सर्व संशयितांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ६ डिसेंबर रोजी मंडणगड ते धुत्रोली पेट्रोल पंपानजिक असणार्या गुरांना इंजेक्शन व खाद्यातून भूलीचे पदार्थ देवून चोरी करणार्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. धुपकर, अक्षय कुंभार, विनय पाटील या पोलीस पथकाने मुंबई येथे जावून संशयित आरोपीस ताब्यात घेतले.www.konkantoday.com