भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी ७ जानेवारीला मुलाखती
रत्नागिरी, दि.17 – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीएसडी) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे नवयुवक व नवयुवतीसाठी २० जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सीएसडी कोर्स आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीस हजर रहावे.
मुलाखतीला येताना सैनिक कल्याण विभाग पुणे (डीएसडब्यूका) यांच्या वेबसाईट सीएसडी 64 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र, त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.