भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा सोशल मिडिया संयोजिका वर्षा राजे निंबाळकर यांचा राजीनामा.
बाळ माने यांचे काम करणार्यांचा उदोउदो भाजपमध्ये होतो. सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा सोशल मिडिया संयोजिका वर्षा राजे निंबाळकर यांनी केली आहे.यापूर्वी महिला जिल्हा अध्यक्षा सुजाता साळवी यांना अवघ्या ६ महिन्यात पदावरून हटवलं होतं. त्या म्हणाल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चांगलं काम केले. विधानसभा निवडणुकीत सोशल मिडियावर ३२ पोस्ट केल्या. मात्र नाव कुठेही नाही. उलट दुसर्याच्या नावाने टाकल्या गेल्या.
बॅनरवरून वगळलं गेलं. महायुतीचा धर्म पाळून आम्ही विधानसभा निवडणुकीत इथल्या महायुतीच्या उमेदवाराचे उदय सामंत यांचे काम केले. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत एक गट आमच्यावर नाराज आहे अशी गटबाजी पक्षात असेल तर काम करताना अडचणी येतात. पक्ष वाढविणे गरजेचे असताना गटबाजी करून पक्षात फूट पाहण्याचे काम सुरु असल्याने आम्ही आमच्या पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवीत आहोत. www.konkantoday.com