ठाण्यातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकानातून पाच कोटीचे दागिने चोरले
वामन शंकर मराठे ज्वेलर्स, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम येथे (HBT) चोरी झाली. अंदाजे 7 किलो वजनाचे आणि सुमारे 5 कोटी रुपये किमतीचे दागिने दोन अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले. नौपाडा पोलीस ठाण्यात एफआयआरची प्रक्रिया सुरू आहे. चोरीच्या दागिन्यांचे नेमके वजन आणि किमतीची मोजणी सुरू असल्याने अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.