संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या.
संगमेश्वर तालुक्यातील रांगव (गवळीवाडी) येथील संदीप सीताराम थोरवसे (४०) या अविवाहित तरूणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.संदीप, त्याची आई तसेच त्याचा मोठा भाऊ हे नित्यनियमाप्रमाणे एकत्र रात्रीचे जेवण आटोपून झोपी गेले. पहाटे संदीपच्या आईला जाग आली तेव्हा संदीप दिसून न आल्याने भयभीत झालेल्या संदीपच्या आईने घरात शोध घेतला. मात्र तो कोठेच दिसून आला नाही. त्यामुळे संदीपच्या आईने बाजूचाच बंद घराचा दरवाजा उघडला असता छताच्या वाशाला नायलॉनच्या रस्सीने संदीप गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. संदीपच्या भावाने ही बाब गावचे पोलीस पाटील रूपेश कदम यांना माहिती दिली.www.konkantoday.com