वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाच्या कामाचा २३ डिसेंबर रोजी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ होणार.
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाच्या कामाचा २३ डिसेंबर रोजी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. तसेच शंकरवाडी-मुरादपूर वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा वाहून गेल्याने दरवर्षी निर्माण होणार्या पूरस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आमदार निकम यांच्या माध्यमातून बंधार्याच्या ठिकाणी पूर संरक्षक भिंतीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभही याच दिवशी निकम यांच्या हस्ते होणार आहे.www.konkantoday.com