राजापूर, चिपळूण ईव्हीएम पडताळणी लवकरच होणार.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रीक व्होटींग मशिन कामकाजावर दोन मतदारसंघातील उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणात मशिनची पडताळणी विहित कार्य पद्धतीनुसार रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येईल. त्यासाठी उत्पादक कंपनीतून दिवस निश्चित केले जातील, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.ते म्हणाले, विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राजापूर आणि चिपळूण येथील उमेदवारांनी ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवले आहेत.
या यंत्रांची पडताळणी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्राच्या उत्पादक कंपनीकडून दिवस निश्चित केला जाईल.
त्या दिवशी सर्व उमेदवारांना निमंत्रित करून त्यांच्यासमोर पडताळणी कार्यक्रम पार पडेल. www.konkantoday.com