महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला
महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा डोक्याचा भाग झाडाला लटकलेला, तर त्या खालील शरीर जमिनीवर कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने लांजा शहरात खळबळ उडाली होती. मात्र, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर संशय दूर झाला.अनिल अनंत गुरव (वय 43, मूळ गाव सत्येश्वर मंदिराजवळ गुरववाडी वनगुळे. सध्या रा. शिंदे चाळ, डावरा वसाहत, लांजा) असे मृताचे नाव आहे.
ही घटना शनिवारी लांजा शहरानजीक असलेल्या गोंडेसखल भूतादेवीच्या जंगलात उघडकीस आली. हा मृतदेह मनोरुग्ण बेपत्ता तरुणाचा असल्याचे समोर आले.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताची पत्नी अश्विनी अनिल गुरव (32, मूळ गाव सत्येश्वर मंदिराजवळ गुरववाडी वनगुळे, सध्या रा. शिंदे चाळ, डावरा वसाहत लांजा) अनिल गुरव हा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मानसिक स्थिती बिघडल्याने घराबाहेर निघून जायचा व दोन ते चार दिवसांनी पुन्हा घरी यायचा. दि.27 रोजी तो बेपत्ता झाल्याची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
त्यानंतर लांजा पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याने तो गोंडेसखल येथे आढळून आला होतात्यानंतर पुन्हा दोन वेळा घरातून गायब झाला. घरी यायचा व घरातून बाहेर पडायचा. 10 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान पत्नी अश्विनी हिला अनिलने फिरून येतो, असे सांगून घराबाहेर पडला. मात्र तो घरी परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेच आढळून आला नाही. याबाबत पत्नी अश्विनी हिने पुन्हा लांजा पोलिसांना फिर्याद दिली होती.