दुसर्या टप्प्यातील मच्छीमार नौकांसाठी ट्रान्सपॉंडरचे आणखी ८५० संच जिल्ह्यात दाखल.
मच्छीमारी नौकांसाठी ट्रान्सपॉंडर बसवण्याचे काम दुसर्या टप्प्यात सुरू झाले आहे. पहिल्या टप्पात ३५० यंत्रे बसवल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात ८५० यंत्रे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली आहेत. जिल्ह्यात सुमारे २००० यंत्रे नौकांवर बसवली जातील, अशी अपेक्षा आहे.मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त आनंद पालव म्हणाले, ट्रान्सपॉंडर या आधुनिक यंत्रामुळे मच्छीमारांना मोठी मदत होणार आहे. समुद्रात असतानाही कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी चांगले साधन उपलब्ध होणार आहे. कोणी मच्छीमार समुद्रात बुडत असेल, नौकेला आग लागली असेल किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत देण्यासाठी यंत्रणांना सुचित करणे आता अधिक सोपे होणार आहे.www.konkantoday.com