दापोली मतदारसंघाला तब्बल 49 वर्षांनंतर योगेश कदम यांच्या रूपाने मंत्रिपद.

जामगे गावचे सुपुत्र तथा दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर दुसर्‍यांदा निवडून गेलेले आमदार योगेश कदम यांनी रविवारी (दि. 15) नागपूर येथे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.त्यांच्या रूपाने दापोली मतदारसंघाला तब्बल 49 वर्षांनंतर मंत्रिपद आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांचा समावेश असलेल्या दापोली मतदारसंघात पहिल्यांदाच मंत्री पद येत आहे. यापूर्वीच्या दापोली विधानसभा मतदारसंघात सन 1975 मध्ये बाबुराव बेलोसे यांच्याकडे मंत्रिपद होते. बंदरे, मत्स्य, पर्यटन, दारूबंदी व उत्पादन शुल्क खाते होते.

या मतदारसंघात सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खेड तालुक्यातील निम्मा भाग जोडला गेला. त्यानंतर युवा सेनेत कार्यरत योगेशकदम यांनी मतदारसंघात बांधणी सुरू केली. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना पराभूत करून या मतदारसंघावरील भगवा खाली उतरवला होता. मात्र, त्यानंतर सन 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत योगेश कदम यांनी संजय कदम यांना पराभूत करून शिवसेनेचा भगवा झेंडा या मतदार संघावर पुन्हा फडकवला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button