जिल्ह्यात १६ ते २० डिसेंबर २०२४ कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र विशेष शोधमोहीम.
सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरूग्ण प्रसार हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील जोखीमग्रस्त भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष शारिरीक तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात १६ ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरूग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जोखीमग्रस्त भागातील नागरिकांनी आपल्या घरी येणार्या आरोग्यसेवकांना तपासणी करू द्यावी व योग्य माहिती देवून सहकार्य करावे तसेच मोहीमेमध्ये कुष्ठरोगाचे निदान झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी केले आहे.
कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम २०२४-२५ च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या सुचनेनुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पूजार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात १२ रोजी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.
बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार तसेच जिल्हा रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सायली नाईक, जिल्हा लेखा व्यवस्थापक लता गुंजावटे व आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.www.konkantoday.com