जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आक्रमक
जिंदल कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. ७० मुलांना वायू गळतीचा त्रास झाला, तरी माणुसकी या नात्याने कंपनीने साधी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. एक अधिकारी रूग्णालयात आला नाही. एवढी कंपनीची मुजोरी आहे. वायू गळती ही धोक्याची घंटा आहे. कंपनीमुळे अनेकजण बेघर झाले आहेत. कंपनीच्या या बेबंदशाहीविरोधात प्रशासनाने काही केले नाही, तर ठाकरे शिवसेना जनआंदोलन छेडेल, असा इशारा उबाठाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी दिला.
या आंदोलनाबाबत जिल्हाधिकार्यांकडे परवानगी मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर संघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख साजीद पावसकर उपस्थित होते. पुनसकर म्हणाले, जिंदल कंपनीमध्ये जी वायूगळती झाली, त्याची वाहतुकीची प्रक्रिया योग्य हेच गळतीचे मूळ कारण आहे. www.konkantoday.com