चिपळूणनमधील तेजानंद गणपत्ये ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत ठरले पुन्हा आयर्नमॅन.
ऑस्ट्रेलियातील बसलटन येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेमध्ये डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी यश मिळवत आयर्नमॅन किताब पटकावला. ३८ कि.मी. पोहणे, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.२ कि.मी. धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार सलगपणे करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
यासाठी १७ तासांचा कालावधी निश्चित करणयात आला होता. मात्र डॉ. गणपत्ये यांनी मागील वर्षी कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या वेळेपेक्षा १ तास २५ मिनिटे कमी वेळ नोंदवून एकूण १३ तास ५२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. www.konkantoday.com