गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्यास व वास्तूचे नुकसान केल्यास शिक्षा होणार.
गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या, वास्तूंचे नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत असून, याला पायबंद घालण्यासाठी महायुती सरकारने आता कायदा केला जाणार आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले.मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे विशेष सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, “खूप महत्त्वाचं विधेयक हे आहे.
गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं, तिथल्या इमारतींचे नुकसान करणे, याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काहीही तरतूद नव्हती. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारचे दहशत निर्माण होईल, अशा प्रकारची तरतूद असलेलं हे विधेयक आहे.” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती