खल्वायन संस्थेच्यावतीने जानेवारीत तीन दिवस रंगणार संगीत नाट्य महोत्सव.
मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सेंटर (एन.सी.पी.ए.) आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात गेली २८ वर्षे सातत्याने संगीत आणि नाट्यक्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरात प्रथमच तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या वातानुकुलीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान संगीत नाट्य महोत्सव रंगणार असल्याची माहिती खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरीत शुक्रवारी खल्वायन संस्थेची या नाट्य महोत्सवासंदर्भात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी कार्यवाह प्रदीप तेंडुलकर व खजिनदार श्रीनिवास जोशी यांचीही उपस्थिती होती. www.konkantoday.com