
रेल्वेमध्ये ज्येष्ठांना पूर्वीप्रमाणे तिकिटात सवलत द्या, शौकतभाई मुकादम यांची मागणी.
कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक पुरूषांसाठी ४० टक्के व महिलांसाठी ५० टक्के कोकण रेल्वेमध्ये प्रवास करणार्या व्यक्तींना तिकिट दरात सवलत देण्यात येत होती. कोरोना कालावधीनंतर ही सवलत कोकण रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.एकदा प्रवाशांसाठी सवलत व सुविधा उपलब्ध करून दिल्यावर ते पुन्हा बंद करणे हे योग्य ठरणार नाही, असे पत्राद्वारे कोकण रेल्वेचे चेअरमन संतोषकुमार झा यांना मुकादम यांनी कळविले आहे.
तसेच या पत्रामध्ये त्यांनी कळविले आहे की, चिपळूण शहरासाठी चिपळूणच्या दिशेने गांधारेश्वर मार्गावर चिपळूण शहरात गुहागर येथे रेल्वे प्रवाशांसाठी तिकिट काऊंटर खिडकी नव्याने सुरू करण्यात आली आहे. ती सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू असते. ही खिडकी २४ तास सुरू ठेवण्यात यावी व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात यावी, अशीही मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.www.konkantoday.com