
रेंगाळलेल्या राजापूर पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाला चालना देणार -आ. किरण सामंत
गेली अनेक वर्षे रखडलेल्या राजापूर पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी नूतन आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केली आहे. पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे. किरण सामंत यांनी या विषयात लक्ष घातले असून त्यांनी बुधवारी पंचायत समिती अधिकार्यांशी चर्चा करून या प्रस्तावाबाबत माहिती घेतली व नव्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे पालकत्व असलेल्या पंचायत समितीचा कारभार ब्रिटीशकाळात बांधण्यात आलेल्या इमारतीमधून आजही सुरू आहे. ही इमारत सुमारे सहा हजार २४८ चौरस फूट आकाराची असून तिची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर आहे.www.konkantoday.com