दापोली खेड मार्गावर मोठा अपघात टळला
.- दापोली खेड रस्त्यावर कुवे घाटी येथे खेड कडून दापोलीकडे येणारा ट्रक क्षमतेपेक्षा अधिक स्टील वाहून नेत असताना काल दुपारी बाराचे सुमारास अपघातग्रस्त झाला. अचानक अवघड वळणावर गाडीतील सामान मागे आल्याने ट्रकची अवस्था घोड्यासारखी झाली. पुढची चाके अचानक वर जाऊन ट्रक मधील क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे लोखंडी सामान हे मागे सरकले आणि पुढील चाके उचलली गेली.
दैव बलवत्तर म्हणून ट्रक कलंडला नाही आणि कोणालाही इजा झाली नाही मात्र जर हा ट्रक दोन चाकावर उभा न राहता कडेला पलटी झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता आरटीओ व पोलीसांचा चालढकलपणामुळे वाहन चालक वारंवार नियमांचे उल्लंघन करित आहेत.यापूर्वी देखील दापोली खेड रस्त्यावरच काळकाईकोंड येथे ट्रकमधून शिगा बाहेर पडून अपघात झाला होता