जिंदाल कंपनीच्या वायू गळतीने बाधीत प्रत्येक विद्यार्थ्यांना कंपनीने दोन लाखाची मदत करावी – अशोकराव जाधव
रत्नागिरी:- :जिंदाल कंपनिच्या वायूगळतीचा फटका 69 विद्यार्थीच्या जिवावर बेतला त्यात कंपनिचा हलर्गर्जिपनाच दिसुन येतो . त्यामुळे 69 बाधित वियार्थीना प्रत्येकी दोन लाख रुपये जिंदाल कंपनीने द्यावेत अशी मागणी अशोकराव जाधव यानी केली याबाबत त्याती पुढे चिंता व्यक्त केली की नशिब भोपाळ ची पुनावृत्ती झाली नाही नाहितर काय घडले असते याची कल्पनाही करवत नाही . असे उद्यगार काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव यानी काढले . या बाबत ते पुढे म्हणाले की वायू गळतीच्या तक्रारी बरोबर कोळशाची पावडर आणि राख या सर्व वस्तीवर पसरते त्या विषयी ही नागरिकांच्या तक्रारी आहेत याबाबत जिल्हा अधिकारी प्रदुषण मंडळ यांचे कडे जनतेने तक्रारी. देवूनही प्रशासन लक्ष देत नाही ही चिंतेची बाब असलेचे मत अशोकराव जाधव यानी नोंदविले .